yuva MAharashtra IND vs ENG : इंग्लंड विरूद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियात या दिग्गजाची एन्ट्री, कोण आहे तो?

IND vs ENG : इंग्लंड विरूद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियात या दिग्गजाची एन्ट्री, कोण आहे तो?

Admin
By -
0

 IND vs ENG : इंग्लंड विरूद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियात या दिग्गजाची एन्ट्री, कोण आहे तो ?


शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर शुबमन गिल याच्या खाद्यांवर भारतीय संघाची धुरा असणार आहे. शुबमन गिल याची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे. रोहित शर्मा याने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे शुबमनला कर्णधार करण्यात आलंय. तसेच विराट कोहली आणि आर अश्विन या दोघांनीही टेस्टमधून रिटायरमेंट घेतली आहे. त्यामुळे शुबमनसेनेसाठी इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका आव्हानत्मक असणार आहे.

इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना 20 जूनपासून हेंडिग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियात तब्बल 22 वर्षांनी एका दिग्ग्जाचं कमबॅक झालं आहे. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये दिग्गज परतला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती टीम इंडियाच्या नेट्स प्रॅक्टीसच्या व्हीडिओद्वारे दिली आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री ही जोडी टीम इंडियात होती तेव्हापासून स्ट्रेंथ एन्ड कंडीशनिग कोच म्हणून सोहम देसाई हे जबाबदारी पार पाडत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने सपोर्ट स्टाफमधील काही जणांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. यामध्ये सोहम देसाई यांचाही समावेश होता.

त्यानंतर आता टीम इंडिया 6 जून रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाली. तर 8 जूनपासून टीम इंडियाच्या नेट्स प्रॅक्टीसला सुरुवात झाली. बीसीसीआयने टीम इंडियाचा नेट्स प्रॅक्टीस करतानाचा व्हीडिओ पोस्ट केलाय. या व्हीडिओत सोहम देसाई यांच्या जागी एड्रीयन ले रॉक्स आले आहेत.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)