yuva MAharashtra ‘मास्क घातलेल्या लोकांना अटक करा’, लॉस एंजेलिसमधील हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश

‘मास्क घातलेल्या लोकांना अटक करा’, लॉस एंजेलिसमधील हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश

Admin
By -
0

 ‘मास्क घातलेल्या लोकांना अटक करा’, लॉस एंजेलिसमधील हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणा जाळपोळ आणि हिसाचार झाल्याचेही समोर आले आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क घालणाऱ्या लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे हे आदेश दिले आहेत. हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

लॉस एंजेलिसमध्ये आंदोलन

डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी राज्य सरकारच्या नियमांना न जुमानता, लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर २००० सैनिक (नॅशनल गार्ड) तैनात करण्याचा आदेश जारी केला.ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा लॉस एंजेलिसच्या नागरिकांकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. यावेळी काही आंदोलक हे मास्क घातलेले होते, त्यांनी जाळपोळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी या मास्क घातलेल्या आंदोलकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या आदेशानुसार सरकारी अधिकारी देशात अवैधरित्या राहणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे आणि त्यांना देशाबाहेर काढण्याचे काम करत आहे. देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगून या लोकांवर कारवाई केली जात आहे. तसेच काही यातील काही लोक हे सरकारविरोधात होणाऱ्या आंदोलनातही सहभागी होत असतात.

मास्क घातलेल्यांना अटक करण्याचे निर्देश

लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या आंदोलनातील अनेक आंदोलक हे मास्क घातलेले होते. त्यामुळे पोलिसांना त्यांची ओळख पटवणे कठीण जात होते, त्यामुळे आता ट्रम्प सरकारने मास्क घातलेल्या लोकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला जात आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कायदेशील पद्धतीने देशात राहणाऱ्या लोकांनाही त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा आंदोलकांना इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमधील आंदोलकाना गंभीर इशारा दिला आहे. निदर्शक जर पोलिस अधिकारी किंवा सैनिकांवर थुंकले तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘लॉस एंजेलिसवर बेकायदेशीर परदेशी नागरिकांनी आणि गुन्हेगारांनी आक्रमण केले आहे. हिंसक जमाव आमच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करत आहेत आणि आमची हद्दपार करण्याची मोहिम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.’





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)